आज श्री राम नवमी निमित्त सुंठवडा
घटकद्रव्ये
घटकद्रव्ये
1 भाग सुके खोबरे
1 भाग खडी साखर
1/2 भाग धने
1/2 भाग सुंठ पावडर
1/4 भाग ओवा
थोडी वेलची पावडर
सुके खोबरे, धने आणि ओवा थोडे भाजून घ्यावे.
मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. खडीसाखर सुध्दा मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावी. नंतर सुंठ पावडर व वेलची पावडर चांगले मिसळून घ्यावे. झाला सुंठवडा तयार……
सुंठवडा च प्रसाद म्हणून का???
विशेषत: श्री राम जन्म व श्री हनुमान जयंती दिवशी तर नक्कीच… इतर देवांच्या जन्मोत्सव प्रसंगी सुध्दा जसे श्री दत्त जयंती, श्री कृष्ण जयंती श्री गणेश जयंती इत्यादी
श्री राम व श्री हनुमान यांचा जन्म भारतवर्षातील वसंत ऋतूमध्ये… त्या मुळे या काळात थंडीत जमा झालेला कफ वसंतऋतूच्या सूर्याच्या उष्णतेने विलयित म्हणजेच द्रवीभूत पातळ व्हायला लागतो. त्यामुळे सर्दी, खोकला असे विकार उत्पन्न व्हायला लागतात. त्यावरउत्तम उपाय म्हणजे सुंठ. चवीला तिखट व गुणाने उष्ण असल्याने कफ कमी करते पण पचल्यावर गोड रस उत्पन्नकरत असल्याने पित्त वाढवत नाही. त्यामळे वात, पित्त व कफ अशा तिन्ही दोषांवर काम करते. म्हणूनच विश्वा, * विश्व भेषज* अशा नावाने सुंठ ओळखले जाते. जगातील सर्व रोगांवर योग्यमात्रा व अनुपानासह वापरता येते.
सुंठवड्यातील इतर पदार्थ सुध्दा असेच काम करतात व खडी साखर शरीरास उपयोगी असा चांगला निराम कफ निर्माण करते. वात व पित्त शमन करते.
सुंठीस स्त्रीमित्र असे ही संबोधले जाते. कारण सुतिकाअवस्थेत सुंठ अत्यंत उपयुक्त आहे. त्या मुळे देवांच्या जन्मानंतर देण्याची रूढी पडली असावी.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी या न्यायाने बाळंतिणीला सुंठ वापरली जाते. याने भूक चांगली लागून पचन शक्ती सुधारल्याने ताकद वाढते व शरीराची झीज भरून निघते.
वैद्य सौ प्रज्ञा आपटीकर
ठाणे
आज श्री राम नवमी निमित्त सुंठवडा Read More »